मठ येथे शिक्षक चंद्रकांत सावंत यांचा सत्कार..

मठ येथे शिक्षक चंद्रकांत सावंत यांचा सत्कार..

वेंगुर्ला /-


श्री देव स्वयंभू मंदिर मठ येथील अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनीआयोजित कार्यक्रमात
जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं. २ चे पदवीधर शिक्षक चंद्रकांत सावंत यांचा मठ सरपंच तुळशीदास ठाकूर,श्री देव स्वयंभू वगैरे देवस्थान उपसमिती मठ चे अध्यक्ष मनोहर गावडे, मठ उपसरपंच
निलेश नाईक आदींच्या हस्ते आदर्श शिक्षक समाजरत्न सन्मान – मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उद्योजक सुरेश बोवलेकर,मठ ग्रा.पं.सदस्य समिर मठकर, बबन परब,निलिमा गावडे,ययाती नाईक,लक्ष्मी परब,निवृत्त शिक्षक विद्याधर कडुलकर,आबा मठकर,मठ हायस्कुल मुख्याध्यापक सुनिल जाधव,अजित तांबे,चित्रा प्रभूखानोलकर,प्रताप बोवलेकर,प्रसाद मठकर,बंड्या ठाकूर, दयानंद शेणई, ग्रामसेवक,तलाठी,आरोग्य कर्मचारी,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी गावामधील गुणवंतांना गौरविण्यात आले.
आजपर्यंत चंद्रकांत सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जि. प. प्राथमिक,उच्चप्राथमिक शाळांमधील १०० हून अधिक विद्यार्थीनी दत्तक घेतल्या असून त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र खानोलकर यांनी केले.

अभिप्राय द्या..