छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ मठ च्या वतीने बारावी गुणवंतांचा गुणगौरव.

छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ मठ च्या वतीने बारावी गुणवंतांचा गुणगौरव.

वेंगुर्ला /-


तालुक्यातील मठ गावातील श्रावणी संजय बागायतकर ( ९३.८३.टक्के) व श्रीधर अरविंद बागायतकर ( ९१.७० टक्के ) या विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे मधून भरीव यश संपादन केले.यानिमित्त छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ मठ यांच्यामार्फत सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मठ उपसरपंच निलेश नाईक,आडेली येथील शिवसेनेचे नितीन मांजरेकर
सुरज बागायतकर,ज्ञानेश्वर बागायतकर,प्रताप बागायतकर,परेश बागायतकर, शैलेश बागायतकर,दीप बागायतकर,सुखदा बागायतकर, पूर्वा बागायतकर, महिमा बागायतकर,निवेदिता बागायतकर,भाऊ बागायतकर, अनिता बागायतकर,समृद्धी पेडणेकर,हेरंब गोलतकर, पियुषा पेडणेकर तसेच गुणवंत विद्यार्थी पालक अरविंद बागायतकर,अमिषा बागायतकर ,संजय बागायतकर,भक्ती बागायतकर आदी उपस्थित होते.नेहमीच शैक्षणिक सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मंडळाचे संजय बागायतकर
यांनी आभार मानले.

अभिप्राय द्या..