कोल्हापूर मधील गगनबावडा तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपत गरजू पुरग्रस्तांना केले धान्य वाटप….

कोल्हापूर मधील गगनबावडा तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपत गरजू पुरग्रस्तांना केले धान्य वाटप….

धकाधकीच्या जीवनात देखील दिला सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश..

दोडामार्ग /-

गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती,यामुळे अनेक जणांचे जनजीवन विस्कळीत देखील झाले होते,जनजीवन विस्कळीत झाल्याने अनेकांच्या कुटुंबांवर मोठा परिणाम झाला असता अन्नधान्याचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सामाजिक बांधिलकी जपणे देखील गरजेचे आहे,हे उद्दिष्ट समोर ठेवून कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधत गरीब मोलमजुरी पूरग्रस्त कुटुंबाना कोल्हापूर जिल्हा वाहतुक सेना प्रमुख मा दिनेश परमार साहेब यांच्याकडून व असळज बाजारपेठ अध्यक्ष मा बाळकृष्ण गावकर, ग्रामपंचायत सदस्य मा बाबुराव कोळेकर याच्या सहकार्यातून मोफत धान्य वाटप करण्यात आले,यावेळी उपस्थित तालुका प्रमुख दत्तात्रय फराकटे, शाखा प्रमुख गणेश सुतार, मा शिवम परमार, मा दिपक सुतार, असळज पोलीस पाटील मा अरुण गावकर पळसबे पोलीस पाटील मा मधुकर गुरव व योगेश गावकर, संतोष येडगे तुकाराम भालेकर, अनिल प्रभूलकर, राजू पाटील, संदीप गुरव, तेजस डाकवे, विनायक गावकर, विष्णुदास गावकर, सिद्धेश महाडिक, प्रकाश शेळके, व सर्व ग्रामस्थ असळज उपस्थित होते.

अभिप्राय द्या..