You are currently viewing महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी.;केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा..

महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी.;केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा..

मुंबई /-

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्याचप्रमाणे या महामार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.सिंधुदुर्गातील आजी माजी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीस अनुसरून गडकरी यांनी संपूर्ण राज्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.राज्यातील पत्रकारांना आजपासून टोलमुक्त प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे.आमदार, खासदार, मंत्री, स्वातंत्र्यसैनिक यांच्याप्रमाणे पत्रकारदेखील समाजासाठी झटत असतात.

सर्वस्व देत असतात जीव धोक्यात घालत असतात.पत्रकार ✒️हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. या पत्रकाराला त्याची सेवा बजावत असताना वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर आपणास टोलमाफी मिळावी,या मागणीसाठी सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. विलिनीकरणाच्या १ वर्षानंतर राष्ट्रउभारणीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी पीएनबी २.० झाली अधिक समर्थ या भेटीवेळी प्रभू यांनी सिंधुदुर्गातील पत्रकारांची मागणी कशी रास्त आहे, हे गडकरींना पटवून दिल्यानंतर केवळ सिंधुदुर्गातील पत्रकारांनाच नव्हे, तर राज्यातील सर्व पत्रकारांना टोलमाफी करीत असल्याची घोषणा गडकरी यांनी केली.

अभिप्राय द्या..