कुडाळ /-

“कष्ट करायची तयारी असेल तर यश दूर नाही .नियोजनबद्ध अभ्यास आणि परिस्थितीवर मात करायची तयारी असेल तर आपली स्वप्नपूर्ती होऊ शकते.” असे उद्गार निवृत्त ए.सी.पी., सहाय्यक संचालक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक, राज्य राखीव पोलीस बल गटाचे निवृत्त समादेशक पी.टी. मर्गज यांनी काढले. ते नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये १५ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “जीवनात स्वयंशिस्त व टापटीपणा फार महत्वाचा आहे’ उच्च बुद्धिमत्ते बरोबर आपले प्रभावी व्यक्तिमत्व इतरेजनांना प्रभावित करत. हुशारीला शरीर सुदृढते ची जोड द्या आणि स्पर्धा परीक्षण सामोरे जा. हे सांगत सिंधुदुर्गातील विद्यार्थी दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत आघाडीवर असतात मात्र स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडतात. याबाबत खंत व्यक्त करीत आपण आपली अल्पसंतुष्ट वृत्ती टाकून देऊन क्लासवन ऑफिसर बनण्याची जिद्द उराशी बाळगली पाहिजे; तसे प्रयत्न करण्याची तयारी ठेवली पाहिजे. म्हणजे यशस्वी होता येते .हे सांगत प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांच्या हस्ते एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांना A सर्टिफिकेटचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपी चे प्राचार्य डॉक्टर सुरज शुक्ला, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. कल्पना भंडारी, कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय आणि रात्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य अरुण मर्गज, बी.एड. कॉलेजचे प्र. प्राचार्य परेश धावडे,सी.बी.एस.ई.सेंट्रल स्कूलच्या मधुरा इंन्सुलकर,इत्यादी उपस्थित होते .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋचा कशाळीकर यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. अरुण मर्गज यांनी व उपस्थितांचे आभार पियूषा प्रभूतेंडोलकर यांनी मानले. यावेळी विविध अभ्यासक्रमाचे अध्यापक, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page