You are currently viewing कळसुली श्री. गिरोबा मंदिर परिसरात युवकांनी राबविले स्वच्छता अभियान..

कळसुली श्री. गिरोबा मंदिर परिसरात युवकांनी राबविले स्वच्छता अभियान..

कणकवली /-

७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत कळसुली गावातील तरुण युवा मित्रमंडळाच्या वतीने ग्रामदैवत श्री. जैन गिरोबा मंदिर स्वच्छता मोहीम शुभारंभ करण्यात आला आहे. यापुढेही कळसुली गावांतील सार्वजनिक ठिकाणाचा परिसर स्वच्छता अभियान राबविणार असल्याचा मानस युवा पिढीने घेतला आहे.

यावेळी कल्पेश सुद्रीक, विराज गोसावी, रुजाय फर्नांडिस,सागर शिर्के, चंन्द्रशेखर चव्हाण, श्रेयस मुरकर, रविंन्द्र घोगळे, यश शिर्के, प्रथमेश परब, मिथिलेश शिरोडकर, तातु गांवकर, चिन्मय घोगळे, मधुकर भोगले उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा