मुंबई /-
दीर्घ कालावधीनंतर प्रवाशांच्या सेवेत रूजू झालेली एसटी बस 50 टक्के प्रवासी क्षमतेने धावत होती. मात्र आज पासून एसटी बस पूर्ण आसन क्षमतेने धावणार आहे.यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळणार असली तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत.गुजरात आणि कर्नाटक राज्यात या पूर्वीच पूर्ण क्षमतेने एसटी प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. 50 टक्के प्रवासी क्षमतेनं सुरू असलेल्या सेवेमुळे महामंडळ तोट्यात जात आहे.
*या असणार आहेत अटी*
बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायजर लावणं बंधनकारक,वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतूक करुनच मार्गस्थ करण्यात याव्यात,लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेससाठी एका आसनावर एक प्रवाशी अशा तिरप्या (Z) पद्धतीने आरक्षण उपलब्ध आहे.सर्व आसने पूर्वीपणे आरक्षणासाठी उपलब्ध करुन द्यावीत.सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसच्या प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.