मुंबई /-

कंगना राणावत आपल्या ट्विटर हँडलवर वाटेल ते बडबडगीते गाऊन रोज राजकारणी, कलाकार यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता तर तिने आपला मोर्चा आता पत्रकारांकडे वळविला असून पत्रकारांना तुरुंगात डांबण्याची धमकी सुद्धा कंगनाने दिली आहे. “टाइम्स नाऊ ” या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने सांगितले होते की, “मला भाजपला मत द्यायचे होते, पण युती असल्यामुळे मला नाईलाजाने शिवसेनेला मतदान करावे लागले.” कंगनाच्या या दाव्यानंतर पत्रकार कमलेश सुतार यांनी आक्षेप घेतला. कंगना जिथे राहते तिथल्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात २०१४ आणि २०१९ साली दोन्ही वेळा भाजपचे उमेदवार उभे होते. हे तथ्य ट्विटरवर मांडल्यानंतर कंगनाचाच चांगलाच जळफळाट झाला असून तिने थेट संबंधित पत्रकाराला कोर्टात खेचण्याची धमकी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page