देशातील रुग्णसंख्या 52 लाखांच्या पार..

देशातील रुग्णसंख्या 52 लाखांच्या पार..

नवी दिल्ली /-

भारतात गेल्या 24 तासात 96 हजार 424 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबत देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने 52 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 174 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 84 हजार 372 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. भारतात सध्या 52 लाख 14 हजार 678 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यामध्ये 10 लाख 17 हजार 754 सक्रिय रुग्ण आहे.तर दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत 41 लाख 12 हजार 552 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

अभिप्राय द्या..