कणकवली /-

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कणकवली पंचायत समितीने जे डेमो हाऊस उभारले त्याची निश्चितच राज्यपातळीवरील समिती देखील दखल घेईल. कणकवली मतदार संघ हा राज्यात प्रत्येक बाबतीत अव्वल स्थानी राहिला आहे. या मतदारसंघातील सर्व सरपंचांचा विमा काढला गेला. देवगड नगरपंचायत ही कोकणपट्ट्यातील पहिली नगरपंचायत आहे की जी पुढील वर्षी 275 लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुलाचा लाभ देणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विचाराचे लोकप्रतिनिधी कशा प्रकारे काम करतात त्याचे उत्तम उदाहरण कणकवली मतदारसंघात पाहायला मिळत आहे असे गौरवोद्गार आमदार नितेश राणे यांनी काढले. कणकवली पंचायत समिती येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत डेमो हाउस चा शुभारंभ व विविध स्तरात यश मिळावीलेल्या ग्रामपंचायती व लाभार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी प्रसंगी श्री राणे बोलत होते. यावेळी कणकवली सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, पंचायत समिती सदस्य सुजाता हळदीवे, मिलिंद मेस्त्री, हर्षदा वाळके, महेश लाड, संदीप मेस्त्री, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, अधीक्षक पी डी पालकर व तालुक्यातील यश मिळविलेले सरपंच, ग्रामसेवक व लाभार्थी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचे घर असावे याकरिता ही योजना अस्तित्वात आणली. असे उद्गार श्री राणे यांनी काढले. यावेळी त्यांनी सत्कार केलेल्या ग्रामपंचायती, सरपंच, ग्रामसेवक व अधिकारी, लाभार्थ्यांचे कौतुकही केले. सभापती मनोज रावराणे म्हणाले, ज्या डेमो हाऊस चे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले, अवघ्या तीन महिन्याच्या आत डेमो हाऊस पूर्ण करून ते आदर्शवत असे मॉडेल जिल्ह्यात सरकार झाले. याचा आनंद असल्याची श्री रावराणे म्हणाले.

कणकवली तालुक्यातील 3200 घरांना या योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे. कणकवली तालुक्यात शोषखड्डे चे सुमारे 5500 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. येत्या काळात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधताना शोषखड्डा बंधनकारक करण्यात येणार आहे. असे श्री राणे म्हणाले. तर प्रकाश पारकर यांनी महाराष्ट्रात आदर्श असे हे डेमो हाउस कणकवली पंचायत समितीने उभारले असून या डेमो हाऊस मॉडेल च्या धर्तीवर तालुक्यातील या योजनेअंतर्गतची घरे देखील अशाच दर्जेदार होतील. लाभार्थ्यांना आपल्या घरात रहायला गेल्यावर त्यांचे समाधान मिळेल असे उद्गार श्री पारकर यांनी काढले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांनी केले. तर आभार गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page