You are currently viewing ग्रामपंचायत कारीवडेच्या वतीने मंडळ अधिकारी गुरुनाथ गुरव यांचा सत्कार..

ग्रामपंचायत कारीवडेच्या वतीने मंडळ अधिकारी गुरुनाथ गुरव यांचा सत्कार..

सावंतवाडी /-

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कारिवडे ग्रामपंचायत तर्फे सरपंच अपर्णा तळवणेकर यांच्या हस्ते आंबोली मंडळ अधिकारी गुरुनाथ गुरव यांचा आदर्श मंडळ अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.श्री गुरुनाथ गुरव हे आंबोली मंडळात सन 2018 पासून काम करीत असून त्यांनी आपले 3 वर्षाचे कालावधीत सर्व सामान्य शेतकऱ्यांची कामे सकारात्मक दृष्टीने चांगल्या प्रकारे केल्याने त्यांच्या कामाची दखल घेऊन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी यांचेकडून आदर्श मंडळ अधिकारी पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेत ग्रामपंचायत माडखोल,कारिवडे, सातुळी बावळट, शिरशींगे, वेर्ले ग्रामपंचायती मार्फत सत्कार करण्यात आला.गुरव यांनी कोरोना ,अतिवृष्टी, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये योग्य नियोजन करून चांगले काम आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

अभिप्राय द्या..