सिंधुदुर्ग जि प.च्या आरोग्य विभागाचे कर्मचारी आजही सातव्या वेतन आयोगापासून वंचित.!;अन्य जिल्ह्यांना मात्र लाभ..

सिंधुदुर्ग जि प.च्या आरोग्य विभागाचे कर्मचारी आजही सातव्या वेतन आयोगापासून वंचित.!;अन्य जिल्ह्यांना मात्र लाभ..

सिंधुदुर्ग जि प.च्या आरोग्य विभागाचे कर्मचारी आजही सातव्या वेतन आयोगापासून वंचित.!;अन्य जिल्ह्यांना मात्र लाभ मिळाला..

महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडील शासन निर्णय दिनांक 02 मार्च 2019 नुसार शासन सेवेतील तसेच जिल्हा परिषदेकडील कर्मचा-याना सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गंत,आश्वासीत प्रगती योजना लागू केली आहे.सलग सेवेची 10, 20 व 30 वर्ष सेवा केलेल्या कर्मचा-यांना पदोन्नतीची वेतनश्रेणी द्यावयाची आहे.

शासन निर्णय होवून अडीच वर्ष झाली तरी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या कर्मचा-यांना या सेवेचा लाभ अद्याप मिळालेला नाही.पहिला व दुसरा लाभ मिळण्यास पात्र ,कर्मचा-यापैकी बरेच कर्मचारी सेवेत असून, दुसरा व तिसरा लाभ मिळण्यास पात्र कर्मचा-यांपैकी बरेच कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यापैकी 2-4 जणांचा मृत्यूही झाला.सिंधुदुर्ग वगळता महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्हा परिषद आरोग्य कर्मचा-यांना या योजनेचा लाभ केव्हाच मिळाला आहे.

ग्रामीण भागात खेडोपाडी आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा बजावणारे कर्मचारी जे सध्या दिवस रात्र कोरोना योध्ये म्हणून काम करत आहेत. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभागाकडील सुमारे xxx कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली, त्यापैकी xx कर्मचा-यांचा कोरोनाने मृत्यूही झाला. मात्र त्यांना देयय असलेल्या आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ मिळाला नाही. मुळातच आरोग्य कर्मचा-यांना पदोन्नतीच्या संधी जवळपास नाहीतच. अशा पदोन्नतीपासून वंचीत कर्मचा-यांना किमान पदोन्नतीचे वेतन तरी मिळावे म्हणून शासनाने ही आश्वासीत प्रगती योजना लागू केली आहे. मात्र क्षेत्रीय कर्मचा-यांना वित्तीय लाभ देण्यास नेहमीच अडथळे निर्माण करणारे झारीतील शुक्राचार्य मात्र हा लाभ घेऊन रिकामे झालेत. जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ब-याच वेळा भेटून, पत्राव्दारे निवेदने देवूनही याची दखल घेतली जात नाही त्यामुळे सर्वच आरोग्य कर्मचा-यांच्या मध्ये अस्वस्थता आहे.

अभिप्राय द्या..