मालवण /-

तळाशील वासियांना पालकमंत्री उदय सामंत व आ. वैभव नाईक यांचा दिलासा तौकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तळाशील येथील आपत्ती व्यवस्थापनासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हा नियोजन मधून तळाशील गावात ५४ लाखाचे दोन बंधारे (संरक्षक भिंत) मंजूर करून घेतले आहेत. यामध्ये तळाशील तोंडवली खाडी किनारी बाळा पेडणेकर ते नरेंद्र मेस्त्री यांचे घर ते मलबारे यांच्या घरापर्यंत संरक्षक भिंत बांधणे निधी २४ लाख ४० हजार रुपये. व तळाशील तोंडवली समुद्र किनारी केळुसकर यांचे घर ते मलबारे यांच्या घरापर्यंत धुप्रतिबंधक बंधारा बांधणे निधी २९ लाख ४३ हजार रुपये. या दोन बंधाऱ्याच्या कामाला तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून येणाऱ्या आठ दिवसांत कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. उर्वरित बंधारे देखील लवकरच मंजूर करण्यात येणार आहेत.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. तळाशील येथे बंधारा नसल्याने अतिवृष्टी व समुद्री उधाणाच्या वेळी येथील ग्रामस्थांच्या घरांना धोका पोहचत आहे. याबाबत ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे बंधारा मंजूर करण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन आ. वैभव नाईक यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून तळाशील गावात तातडीने ५४ लाखाचे दोन बंधारे (संरक्षक भिंत) मंजूर करून घेतले आहेत. तसेच गतवर्षी येथील समुद्र किनारी आ. वैभव नाईक यांनी १.५ कोटीचा जिओ ट्यूब बंधारा मंजूर करून आणला होता. त्याबाबतच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या मात्र ग्रामस्थांनी समुद्र किनारी दगडी बंधारा बांधण्याची मागणी केल्याने आ. वैभव नाईक यांनी पुन्हा पाठपुरावा करून जिओ ट्यूब बंधाऱ्या ऐवजी दगडी बंधारा मंजूर करून घेतला आहे. त्या बंधाऱ्याचे काम देखील डिसेंबर नंतर सुरु होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page