जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे थाटात उद्घाटन

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे थाटात उद्घाटन

कुडाळ /-

कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले तर शेतकरी मागे पडणार नाही असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी रानभाजी मोहत्सवाच्याउद्घाटन प्रसंगी शनिवारी येथे केले येथील वासुदेवानंद सभागृहात रविवार पर्यंत हा रानभाजी महोत्सव चालणार आहे या महोत्सवाचे उद्घाटन आमदार नाही यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत जि प सदस्य संजय पडते नागेंद्र परब अमरसिंग सावंत राजू कविटकर उपसभापती जय भारत पालव माजी जिप अध्यक्ष विकास कुडाळकर अतुल बंगे मथुरा राहुल अनघा तेंडुलकर श्रेया परब बाजीराव झेंडे प्राध्यापक प्रदीप हळदवणेकर तहसीलदार अमोल पाठक सहाय्यक गटविकास अधिकारी एम बी जिल्हा कृषी अधीक्षक सिद्धांना मेत्रे उपविभागीय कृषी अधिकारी अडसुळे आदी उपस्थित होते यावेळी आमदार नाईक यांनी महोत्सवाचे नेटके आयोजन केल्याबद्दल कुडाळ तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे यांचे कौतुक केले आमदार नाईक म्हणाले कुडाळ हा गावठी भाजी यांचा तालुका म्हणून ओळखला जातो तालुक्यात गावठी भाजीला पोटेन्शियल आहे भाजी पिकाचे काम करताना शेतकऱ्यांना कृषी विभागाने सहकार्य करावे त्यांचे संशोधन करून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावीविविध रान भाज्याची रेसिपी तयार करण्यासाठी प्रोत्साहित करावे कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रस्तावित केले तर शेतकरी मागे पडणार नाही प्रलंबित असलेले गीर कोटी शासनाने कृषी विभागाला दिले आहेत शेतकऱ्यांनी विकेल ते पिकवावेअसे आवाहन त्यांनी केले. दरम्यान आमदार वैभव नाईक यांनी काही अधिकाऱ्याला कानपिचक्या दिल्या लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वाद राहतात काही अधिकारी काम करत नसल्याचा थेट आरोप त्यांनी स्पष्ट शब्दात केला आणि नाराजी प्रकट केली अधिकाऱ्यांनी मुख्यालयात राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले कृषी विभागाची मंडल कार्यालय तालुका कृषी कार्यालयात आहेत याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले मंडल कार्यालय ही मंडलातच गावात असावी अधिकार्‍यांनी आपल्या सोयीसाठी ही कार्यालये तालुका कार्यालयात आणली याबाबत कृषी मंत्री दादा भुसे यांची आपण लक्ष वेधले असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक अमोल करंदीकर यांनी केले

अभिप्राय द्या..