हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य,युवा मोर्चा व ग्रामपंचायत खोक्रल यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केले भव्य आरोग्य शिबीर..

हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य,युवा मोर्चा व ग्रामपंचायत खोक्रल यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केले भव्य आरोग्य शिबीर..

दोडामार्ग /-

हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा दोडामार्ग व ग्रामपंचायत खोक्रल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबीर आज सकाळी खोक्रल गावात आयोजित करण्यात आले असून या संस्थे मार्फत सर्वरोगवर मोफत निदान शिबिर व मोफत औषधे वाटप करण्यात आली सर्व प्रथम अंखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली यासाठी हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शिवशाहीर डॉ. शिवरत्ना शेटे (एम डी) यांचा मार्गदर्शन खाली डॉ. संभाजी भोसले यांच्या नेतृ्त्वाखाली , सोलापूर,पुणे, अहमदनगर, येथील डॉक्टरांनीं सेवा दिली यावेली , डॉक्टर व सर्व सहकारी यांचे ग्रामपंचायत मार्फत पुष्प गुच्छ देऊन स्वागत देखील करण्यात आले असून आज पर्यंत हिंदवी परिवार मार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात १०० पेक्षा जास्त आरोग्य शिबीर, आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्य, तसेच वीस वर्शा पासून गडकोट मोही राबवली जात आहेत,
आज गावातली १०७ ग्रामस्थांनीची या शिबिरात तपासणी करून त्यांना औषध देण्यात आली या वेळी डॉ.संभाजी भोसले व त्यांची पूर्ण टीम, खोक्रल गावचे सरपंच देवेंद्र शेटकर, उपसरपंच गोपाळ नाईक, ग्राम पंचायत सदस्य, विनायक गवस, हेमा गवस, अंजु गवस, सविता गवस, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक गवस, प्रमोद गवस, नवनाथ सलोस्कर, अजय गवस, विशाल नाईक, विक्रम जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ गवस व गावातली ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..