You are currently viewing पूरग्रस्त गावांमध्ये नियमित आरोग्य तपासणी करा; आरोग्य सभापती अनिशा दळवी यांनी दिला आदेश….

पूरग्रस्त गावांमध्ये नियमित आरोग्य तपासणी करा; आरोग्य सभापती अनिशा दळवी यांनी दिला आदेश….

दोडामार्ग /-

गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टी मुळे जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती, यामुळे साचलेले गाळाचे दूषित पाणी घरा घरांमध्ये गेल्याने दूषित पाण्यामुळे सर्वत्र आजार पसरण्याची दाट शक्यता आहे,या पार्श्वभूमीवर याचा एकंदरीत विचार करता सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण आरोग्य सभापती डॉ.अनिशा दळवी त्यांनी प्रत्यक्षरित्या पाहणी केली असता पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी दलदल पसरली असून तसेच डास, मृत जनावरे इतर मृत प्राणी यांच्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे प्रशासनाकडून गावात निर्जंतुकीकरण फवारणी, ब्लिचिंग पावडर टाकणे, नाल्यांमध्ये औषध टाकणे,औषध कॅम्प लावणे, तसेच आजार प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करणे,अशी कामे सुरू करण्याचे आदेश व याबाबत उपाय योजना करण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवी यांनी दिले असता जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाय योजना आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आले आहेत पुढील सात दिवसात प्रत्येक पूरग्रस्त गावात आरोग्य तपासणी केली जाणार आहेत अशी माहिती देखील जिल्हा परिषद आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी यांनी दिले आहेत.

अभिप्राय द्या..