You are currently viewing एमटीडीसीने केलेल्या निकृष्ट कामांच्या विरोधात नगराध्यक्ष संजू परब यांचे उद्या सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोर उपोषण..

एमटीडीसीने केलेल्या निकृष्ट कामांच्या विरोधात नगराध्यक्ष संजू परब यांचे उद्या सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोर उपोषण..

सावंतवाडी /-

सावंतवाडी शहरात एमटीडीसीच्या माध्यमातून झालेल्या निकृष्ट कामांच्या विरोधात नगराध्यक्ष संजू परब उद्या प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत.यावेळी झालेल्या संबंधित कामांची चौकशी करण्याची मागणी ते करणार आहेत.याबाबत श्री.परब यांनी प्रसिद्धी पत्रक दिले. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की चांदा ते बांदा योजनेतून सावंतवाडी नगरपरिषदेच्या हद्दीत तसेच आंबोली येथे कामांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र एमटीडीसीच्या माध्यमातून करण्यात आलेली ही कामे निकृष्ट असून त्यात कोट्यावधी रुपयांचा अपहार झाला, असा आरोप श्री. परब यांनी केला होता. तर या प्रकाराला माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर व संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र राजकीय दबावाखाली चौकशी टाळण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे श्री.परब यांनी यांनी उद्या आपण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा