कुडाळ एसटी स्टँड च्या शेडच्या कामाचे फुकाचे श्रेय कोणी घेऊ नये.; जेडी नाडकर्णी

कुडाळ एसटी स्टँड च्या शेडच्या कामाचे फुकाचे श्रेय कोणी घेऊ नये.; जेडी नाडकर्णी

कुडाळ /-

कुडाळ एसटी स्टँड च्या शेडच्या कामाचे फुकाचे श्रेय कोणी घेऊ नये जेडी नाडकर्णी अनेक दिवस रेंगाळत असलेल्या कुडाळ एसटी स्टँड चे काम हे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळेच झालेले आहे हे तरी तीवार सत्य असले, तरी काही लोक मेलेल्या वाघाच्या शरीरावर पाय ठेवून तो वाघ आम्हीच मारला या भूमिकेत वावरत आहेत.

कुडाळ एसटी स्टँड च्या कामाची दुर्दशा तसेच त्यामध्ये रेंगाळलेल्या अनेक कामाचा पाठपुरावा हा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने केलेला असून त्याचे श्रेय कोणीही घ्यायचा प्रयत्न करू नये तात्पुरते नेमलेल्या विभाग नियंत्रक काकडे अर्ज देऊन सदर काम झालेले नसून, संपूर्ण कामाचा पाठपुरावा हा मुंबई सेंट्रल ऑफिस मध्ये जाऊन आम्ही केलेला आहे, व ते खोटे असल्यास कुठल्याही व्यक्तीने त्याची सही निशा करून पहावी श्रेयः घ्यायची आमची सवय नसून काम झाले पाहिजे हे आमचे धोरण आहे पण जर का कोणी ते काम आमच्या मुळे झाले आहे असे म्हणत असेल तर ते खेदजनक आहे.असे मनसेचे राज्य उपाध्यक्ष श्री.बनी उर्फ जेडी नाडकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले आहे.

अभिप्राय द्या..