खावटी कर्जमाफीसाठी अपात्र शेतकऱ्यांनी ऑगस्ट पर्यंत कर्जफेड केल्यास पुढील कर्जासाठी केवळ ९ % व्याज..

खावटी कर्जमाफीसाठी अपात्र शेतकऱ्यांनी ऑगस्ट पर्यंत कर्जफेड केल्यास पुढील कर्जासाठी केवळ ९ % व्याज..

सोसायटिंकडून होमलोन घेतल्यास शेतकऱ्यांना १४ हजार ५००रु. ची स्टॅम्प ड्युटी माफ.;जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती..

कणकवली /-

कणकवली तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत सोसायटींच्या खावटी कर्जमाफीसाठी 7 हजार 673 शेतकरी पात्र असून 12 कोटी 73 लाख रुपयांचे कर्जमाफ होणार असल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 1 ऑगस्ट 2017 पासून 8 हजार 362 शेतकऱ्यांनी खावटी कर्ज घेतले. हे सर्व 8 हजार 362 हजार शेतकरी खावटी कर्जमाफीस पात्र नाही आहेत. मागील 3 वर्षांपासून हे कर्ज थकीत आहे. खावटी कर्जाचा व्याजदर हा 14 % आहे. जे शेतकरी ऑगस्ट 2021 पर्यंत थकीत कर्ज फेडतील त्यांना नव्याने केवळ 9 टक्के दराने खावटी कर्ज मिळेल. यानुसार जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्जावर 5 टक्के सवलत देत असल्याची घोषणा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली. यापुढे सहहिस्सेदारांची संमती नसली तरी शेती कर्जपासून वंचित शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेवर बोजा ठेवून कर्ज देण्यासंदर्भात विचार सुरू आहे. 2018-19 आणि 2019 -20 सालमधील शेतकऱ्यांच्या कर्जावरील मिळणारे 6 % व्याज अनुदान अद्याप मिळालेले नाही. ऑगस्ट महिन्यातील जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. गृहकर्ज बांधणी घेतलेल्या शेतकऱ्याला मॉर्गजसाठी 15 हजार खर्च येतो. यापुढे जिल्ह्यातील 216 सोसायट्यांकडून केवळ 500 रुपयांच्या बॉण्डवर 10 लाखांचे कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. 1 ऑगस्ट पासून याची जिल्ह्यात अंमलबजावणी झाली असून बँकेईतकेच 10 टक्के व्याजदराने 15 वर्ष मुदतीसाठी गृहकर्ज शेतकऱ्यांना दिले जात असल्याचे सावंत यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई उपस्थित होते.

अभिप्राय द्या..