अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन..

अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन..

सिंधुदुर्ग /-

जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनां निवेदन देऊन आज सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्यांक कल्याणकारी योजना बाबत प्रशासनाकडून होणारी दुर्लक्ष व निष्काळजी पणामुळे समाजाचं शैक्षणिक व विकास कामाबाबत शासनाकडून येणारी कल्याणकारी योजना बारा कलमी कार्यक्रम ची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे परदेशात जाऊन शिक्षण घेणारे विद्यार्थीचा शैक्षणिक नुकसान होत आहे आज पर्यंत आपल्या जिल्ह्यात अल्पसंख्यांक कार्यालय नोडल अधिकारी प्रशासन अधिकारी नाही आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक समाजाची योजना लोकांपर्यंत राबवली जात नाही व माहिती मिळत नाही. तसाच मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ चा कुठलाही अधिकारी नोडल ऑफिसर आपले जिल्ह्यात नाही तसाच मौलाना आझाद मंडल करून जे एजन्सीची नेमणूक केलेली आहे त्याचं नोडल्स अधिकारी हे रत्नागिरीत राहत असून तो जिल्ह्यात कधी येत नाही त्यामुळे शिक्षणीक व आर्थिक विकास कामाचा नुकसान होत आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ चा अधिकारी जिल्ह्यातली एजन्सीला देऊन जिल्ह्यातले अल्पसंख्यांक समाज वर होणारी गैरसोयीचा निष्कर्ष करण्यात यावे तसाच अल्पसंख्याक योजनांची अंमलबजावणी साठी कायमस्वरूपी अधिकारी ची नेमणूक करण्यात यावी.अशी मागणी जिल्हा अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..