डॉ.सारंग यांची हिंगोली येथे झालेली बदली होणार रद्द.;आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी यांना आश्वासन..

डॉ.सारंग यांची हिंगोली येथे झालेली बदली होणार रद्द.;आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी यांना आश्वासन..

दोडामार्ग /-

साटेली भेडशी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सारंग यांची काल संध्याकाळी हिंगोली येथे बदली झाल्याचे पत्र आले होते.याची गंभीर दखल घेत जि.प.आरोग्य आणि शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी यांनी बदली स्थगित करण्यासाठी प्रयत्न चालू केले होते.त्या अनुषंगाने त्यांनी तातडीने राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.राजेश टोपे यांचेशी संपर्क साधला. आणि त्यांना वस्तुस्थिती समजाऊन सांगितली.त्यावर आरोग्य मंत्री मा.राजेश टोपे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बदली स्थगित करण्याचे मान्य केलें. डॉ.दळवी यांनी यासाठी महाराष्ट्राचे आरोग्य सचिव श्री.प्रदीप व्यास यांचेशी पत्र व्यवहार केला.त्यामुळे डॉ.सारंग यांची बदली स्थगित होईल किंवा बदली डॉक्टर मिळेल अशी माहिती डॉ.अनिषा दळवी यांनी दिली आहे.यासाठी आमदार नितेशजी राणे व राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..