अनधिकृत वाळू उपसा प्रकरणी एडगाव (तांबेवाडी) च्या ग्रामस्थांची स्थानिक प्रशासनाकडे तक्रार..

अनधिकृत वाळू उपसा प्रकरणी एडगाव (तांबेवाडी) च्या ग्रामस्थांची स्थानिक प्रशासनाकडे तक्रार..

तात्काळ कारवाई करण्याची निवेदनाद्वारे केली मागणी..

वैभववाडी /-

वैभववाडी तालुक्यातील एडगाव (रामेश्वर मंदिर) नजिक नदीवर तांबेवाडीकडे जाणारा लोखंडी ब्रीज आहे. गेली कित्येक वर्षे तांबेवाडीतील ग्रामस्थ लोखंडी साकवावरुन प्रवास करतात. त्यास पर्यायी ब्रिज बांधण्याचे काम सुरू आहे. सदरच्या नविन पुलाचे सिमेंटचे पिलर देखील नदीपात्रात उभारले आहेत. परंतु कोणीतरी अज्ञात व्यक्तींकडून रात्रीच्या वेळी नदिपात्रातील पिलरच्या जवळील वाळू काढून नदिपात्रा नजिक वाळूचे ढिग ठेवले आहेत, ही बाब तांबेवाडी ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. सदर घटनेची तात्काळ दखल घेऊन वैभववाडी स्थानिक प्रशासनाने संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या मागणीचे निवेदन आज तहसीलदार व पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..