मसुरे /-
वनविभाग कट्टा व वाइल्ड लाईफ इमरजन्सी रेस्क्यू सर्विसेस सिंधुदुर्ग यांनी मसुरे कावावाडी येथील शेत विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास जीवदान दिले. येथील बबन वायंगणकर याना शेत विहिरीत कोल्हा पडल्याचे आढळून आल्या नंतर त्यांनी सर्प मित्र रमण पेडणेकर याना माहिती दिली.तसेच कोल्ह्याला विहिरीत आधारासाठी लाकडी बांबू टाकले. रमण पेडणेकर यांनी रेस्क्यू टीमला याबाबत कळविल्या नंतर वनविभागाचे श्री परीट, श्री सारीक यांनी पिंजरा घेऊन कावा येथे दाखल होत रात्री उशिरा कोल्ह्यास विहिरी बाहेर काढले. यावेळी वाइल्ड लाइफचे अध्यक्ष अनिल गावडे, आनंद बांबर्डे कर, वैभव अमृस्कर,ओंकार लाड, रमण पेडणेकर, सतीश मसुरकर, बबन वायंगणकर, कल्पेश वायंगणकर यांनी मदत कार्यात सहभागी होत कोल्ह्यास जीवदान दिले. वनविभागाच्या वतीने कोल्ह्याला जंगलात सोडण्यात आले.