मालवणात काँग्रेसकडून रोजगार व अर्थव्यवस्था बचाव दिन साजरा..

मालवणात काँग्रेसकडून रोजगार व अर्थव्यवस्था बचाव दिन साजरा..

मालवण/ –

मालवण तालुका राष्ट्रीय कांग्रेस तर्फे १७ सप्टेंबर हा रोजगार व अर्थव्यवस्था बचाव दिवस म्हणुन साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश सदस्य साईनाथ चव्हाण यांनी राज्यातील महाआघाडी शासनाच्या माध्यमातून होत असलेल्या कामांची माहिती देऊन संपुर्ण जिल्ह्यात उत्स्फुर्तपणे‌‌ शासन आदेशाप्रमाणे रोज़गार व अर्थव्यवस्था बचाव दिवस म्हणुन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. काँग्रेस तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी अल्पावधीत आयोजित केलेला हा कार्यक्रम मालवण भरड येथील लीलांजली हॉल मध्ये पार पडला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मास्क लावणे, सोशल डिस्टनसिंग आदी नियमांचे पालन केले. मेघनाद क्सप्रेस यांनी सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमास महेंद्र मांजरेकर, मधुकर लुडबे, संदिप लुडबे, जेम्स फर्नांडिस, संदेश कोयंडे, सतीश कदम, लक्ष्मिकांत परुळेकर, प्रथमेश करंगुटकर, मयुरेश तोडणकर, श्रेयस माणगांवकर, गोविंद चव्हाण, साईल मेंडिस, अब्दुल मुजावर, अक्षय गावकर आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..