You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या लसीकरणात गोंधळ..

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या लसीकरणात गोंधळ..

सावंतवाडी /-

उपजिल्हा रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या लसीकरणात गोंधळ होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अध्यक्ष डाॅ.उत्तम पाटील यांच्यासह अन्य डॉक्टर कर्मचारी यांना धारेवर धरले. पहाटे रांगेत उभ्या राहणाऱ्या सर्वसामान्य माणसांना कुपन मिळत नाही परंतु राजकीय वसेलीबाजीवाल्यांना कुपन मिळते हे तात्काळ थांबवा,अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही अशा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी शहराध्यक्ष देवा टेमकर, महिला शहराध्यक्ष चित्रा देसाई, ओशोक पवार,शफीक खान, ऑगस्टीन डिसोजा, जावेद शेख, संतोष जोईल, इफतिका राजगुरू,आसिफ ख्वाजा, याकूब शेख आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..