खर्डेकर महाविद्यालयाच्या NCC युनिटने पूरग्रस्तांना केले मदतीचे वाटप..

खर्डेकर महाविद्यालयाच्या NCC युनिटने पूरग्रस्तांना केले मदतीचे वाटप..

वेंगुर्ले /-

एन. सी.सी.युनिट बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय.वेंगुर्ला यांनी २३ जुलै,२०२१ रोजी आलेल्या महापूरमूळे प्रभावीत निमजगाव व गडगेवाडी, बांदा येथिल ४५ कुटुंबाना घरोघरी प्रत्यक्ष जाऊन अन्न धान्य वाटप करून मदत केली. बांदा ग्रामपंचायतीचे सरपंच श्री आक्रम खान यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्राचार्य. डॉ. विलास देऊळकर व एन. सी.सी.ओफिसर ले. डॉ. बी.जी.गायकवाड . बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला यांचे या सामाजिक सहकार्याबद्दल आभार मानले. सदर सामाजिक कार्यास एन. सी.सी. च्या सर्व कॅडेट्सनी स्वइच्छेन व उत्स्फूर्तपणे शक्य होईल तेव्हढे अन्न धान्यच्या रूपात मदत केली.

अभिप्राय द्या..