कसाल बाजारपेठ आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय..

कसाल बाजारपेठ आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय..

ओरोस /-

ओरोस पणदूर कुडाळ माणगाव पाठोपाठ आता कसाल बाजारपेठही बंद ठेवण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी झालेल्या कसाल व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. सोमवार दिनांक 21 ते सोमवार दिनांक 28 या आठ दिवसात कसाल बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे वाढत्या कोरोणा महामारी ची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सिद्धेश मालणकर यांनी दिली. कसाल ही जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेली बाजारपेठ आहे त्यामुळे अन्य बाजारपेठा बंद असल्याने या बाजारपेठेत वर्दळ होऊ लागली त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी आठ दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला या बैठकीला व्यापारी संघटनेचे नवीन बांदेकर निलेश पावसकर बाळा कांदळकर आदी व्यापारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..