मठ टाकयेवाडी येथील युवक गितेश गावडे याला वेंगुर्ले तालुका वासियांतर्फे श्रद्धांजली…

मठ टाकयेवाडी येथील युवक गितेश गावडे याला वेंगुर्ले तालुका वासियांतर्फे श्रद्धांजली…

वेंगुर्ला /-


बांदा गाळेल येथे डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत मयत झालेल्या मठ टाकयेवाडी येथील युवक व क्रिकेटपटू गितेश गावडे याला वेंगुर्ले तालुका वासियांतर्फे मठ येथील सयंभू मंगल कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली.
मठ ग्रा. पं. ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास शोधमोहीम यशस्वीपणे राबविणारे एनडीआरएफचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी आमदार दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत,आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे,महसुल कर्मचारी,बांदा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व कर्मचारी, सावंतवाडी पं. स. च्या गटविकास अधिकारी, जि. प. अध्यक्षा संजना सावंत,जि. प. सदस्य,वेंगुर्ले नगरसेवक नागेश गावडे,जेसीपीलोडरचे मालक आणि कर्मचारी, बांदा सरपंच अक्रम खान, ग्रा. पं.सदस्य, एनडीआरएफच्या जवानांना व इतर लोकांना जेवण व चहापाणी याची व्यवस्था करणारे बांदा सटमटवाडी येथील परब कुटुंबिय, साईप्रसाद काणेकर,निलेश कदम,जय भोसले,ऋषी हरमलकर,सचिन वीर,हुसेन मकानदार या व इतर मदत करणाऱ्या सर्वांप्रती यावेळी कुतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील शेकडो क्रिकेटपटू तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक मठ सरपंच तुलशीदास ठाकूर तर सुत्रसंचालन व आभार रविंद्र खानोलकर यांनी मानले.

अभिप्राय द्या..