You are currently viewing सायबर क्राईम गुन्ह्यातील संशयिताची जामिनावर मुक्तता..

सायबर क्राईम गुन्ह्यातील संशयिताची जामिनावर मुक्तता..

वेंगुर्ला /-


सायबर क्राइम गुन्ह्यातील संशयित आरोपी महादेव रामचंद्र शेट्ये (२६) पेंडूर, मातोंड याला दि. ०१/०८/२०२१ रोजी वेंगुर्ला न्यायालयासमोर हजर केले असता वेंगुर्ला न्यायालयाने संशयीत आरोपीची रक्कम रुपये पंधरा हजार च्या जामीनावर मुक्तता केली.संशयिताच्या वतीने ऍड.मनिष सातारडेकर व कु.अक्षदा राऊळ यांनी काम पाहिले.दि. २१/०१/२०२१ रोजी फिर्यादीने
दिगंबर लाडू कवटकर (३३)
पेंडूर,घोडेमुख याने वेंगुर्ला पोलिस स्टेशन येथे
त्याचे फेसबुक अकाऊंट कोणत्यातरी अज्ञात इसमाने हॅक करून त्याच्या फ्रेंडफ्लिस्ट मधील मित्रांना गावातील लोकांन संदर्भात आक्षेपार्य मजकूर आलेले मॅसेज पाठविले असल्याची तक्रार फिर्यादी याने वेंगुर्ला पोलिस स्टेशन येथे दिली होती. सदर फिर्यादीस अनुसरुन वेंगुर्ला पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी केली असता, सदर गुन्ह्याच्या तपासात फेसबुक कंपनीकडून प्राप्त झालेल्या आय. पी.
एड्रेसच्या माहितीनुसार व आय. पी. कंपनीकडून गुन्ह्यातील आरोपी याने ज्या मोबाईल कंपनीचा फेसबुक अकाऊंट हॅक करण्यासाठी वापर केला होता, तो मोबाईल नंबर जिओ कंपनीचा असल्याचे निष्पन्न झाले. सदर मोबाईल नंबरचे सी.डी. आर. व एस. डी. आर. तसेच सदरचा मोबाईल नंबर कोणाच्या नावे आहे,याची डिटेल्स प्राप्त केल्यावर तो नंबर संशयित आरोपी महादेव रामचंद्र शेट्ये याच्या नावे रजिस्टर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे संशयित आरोपी विरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क) प्रमाणे गुन्हा नोंद करून त्याला दिनांक ३१/०७/२०२१ रोजी अटक करण्यात आली व दिनांक ०१/०८/२०२१ रोजी संशयित आरोपीला वेंगुर्ला न्यायालय समोर हजर केले असता, वेंगुर्ला पोलिसांनी अधिक तपास करण्याकरता आरोपीला दोन दिवस पोलिस कस्टडी मिळावी अशी न्यायालयात मागणी केली. परंतु आरोपीचे वकिल ऍड. मनिष सातारडेकर यांनी पोलिस कस्टडीस आक्षेप घेत आपला युक्तीवाद न्यायालया समोर मांडला व आरोपीला जामीन मिळावा अशी मागणी केली असता आरोपीच्या वतीने वकिल मनिष सातार्डेकर यांनी केलेला युक्तीवाद व त्यांनी संशयित आरोपीच्या वतीने न्यायालयात मांडलेली बाजू ग्राह्य मानून वेंगुर्ला न्यायालयाने संशयीत आरोपी याची पंधरा हजाराच्या जामिनावर मुक्तता केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा