महिला उत्कर्ष समितीच्या वतीने गुणवंतांचा गौरव!

महिला उत्कर्ष समितीच्या वतीने गुणवंतांचा गौरव!

मसुरे /-

पत्रकार उत्कर्ष समितीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या कणकवली तालुक्यातील स्पर्धक कु.धैर्या बांदेकर,श्रद्धा पाटकर यांना महिला उत्कर्ष समितीच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.त्याचबरोबर रेडिओच्या नागपूर आकाशवाणीवरून प्रसारीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी जि.प.पू.प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु.ईश्वरी किशोर दळवी व स्वयंसेवक कु.श्रद्धा सतिश पाटकर यांची निवड करण्यात आली होती.त्यांच्या मुलाखतीचे प्रसारण १३ जूलै रोजी करण्यात आले.त्यांच्या या कार्याचे कौतुक तसेच त्यांना प्रेरणा देण्यासाठी महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.जिल्हाध्यक्षा सौ.ज्योतिका हरयाण म्हणाल्या, महिला उत्कर्ष समिती हे महिलावर्गासाठी तयार केलेलं व्यासपीठ आहे.समाजातील सर्व महिलांना पाठबळ देण्याचं काम आम्ही करत आहोत
त्याचबरोबर आपल्यामध्ये काय कमी आहे ते न पहाता आपल्यात काय चांगले आहे ते पहावे आणि मार्गक्रमण करावे. सत्कारमुर्तींना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.सचिव सुप्रिया पाटील, श्रद्धा पाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. सदस्या दुर्वा मानकर, स्वरदा खांडेकर, सविता चव्हाण, पूजा बांदेकर उपस्थित होत्या.

अभिप्राय द्या..