७५ लाखांचा पर्यटन निधी सर्व वॉर्डात समान खर्च करावा.;शिवसेना विभागप्रमुख तुषार पेडणेकर

७५ लाखांचा पर्यटन निधी सर्व वॉर्डात समान खर्च करावा.;शिवसेना विभागप्रमुख तुषार पेडणेकर

देवगड /-

देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील सद्या खुल्या क्षेत्रामधील एकच नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये सुमारे 75 लाखाचा पर्यटन निधी खर्च करण्याचा घाट सत्ताधारी पक्षाने केला असून सदर 75 लाखाचा पर्यटन निधी हा सर्व वॉर्डमध्ये समान निधी खर्च करण्यात यावा अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना विभाग प्रमुख तुषार पेडणेकर यांनी दिली आहे.देवगड शिवसेना कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी तालुका प्रमुख विलास साळसकर, शहर प्रमुख संतोष तारी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पेडणेकर म्हणाले कि, देवगड-जामसंडे नगरपंचायतीमध्ये 75 लाखाचा खुल्या क्षेत्रावरती खर्च करण्यासाठी पर्यटन निधी प्राप्त झाला आहे. हा निधी एकाच नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये खर्च करण्याचा घाट नगरपंचायतीने रचला आहे. यामुळे हा निधी नगरपंचायतीच्या सर्व वॉर्डमध्ये खुल्या क्षेत्रावरती समान प्रमाणात वाटप करण्यात यावा. तसेच देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील मुणगेकर नगरी ते आनंदवाडीरस्त्याच्या  संरक्षक भिंत बांधणे, भराव टाकणे, खडीकरण डांबरीकरण करणे सदर काम हे निष्कृष्ट दर्जाचे झाली असल्याची तक्रार जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपंचायत विभागाला निवेदनाव्दारे 8 जुलै रोजी शिवसेना पक्षाच्यावतीने देण्यात आली होती. सदर रस्त्यावरील फक्त संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यानंतर गेल्या दोन दिवसामध्ये सदर रस्त्यावरती भराव टाकण्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असता शिवसेना पक्षाने ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हे काम बंद पाडले आहे. जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपंचायत विभागाच्या गुणवत्ता धारक कर्मचा-यांच्या उपस्थितीमध्ये रस्त्याची पाहणी व दर्जा ठरविताना ग्रामस्थ व तक्रार दारांच्या उपस्थितीमध्ये करण्यात यावी अन्यथा 15 ऑगस्ट रोजी दिलेला उपोषणाचा ईशारा कायम राहिल तसेच या रस्त्याचे काम काळ्या यादीमध्ये नाव असलेल्या ठेकेदाराला दिले आहे. यामुळे देवगड-जामसंडे नगरपंचायत नियमांना धरुन काम करीत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये पेडणेकर यांनी दिली.

अभिप्राय द्या..