You are currently viewing बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालय तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल..

बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालय तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल..

कुडाळ /-

मुंबई विद्यापीठातर्फे मे 2021 मध्ये घेण्यात आलेल्या वाणिज्य शाखेच्या अंतीम वर्षाचे निकाल लागले असून कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयाच्या(तृतीय वर्ष) वाणिज्य शाखेचा निकाल १००%लागला . .. . कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै कला वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामध्ये आरती रामू नाईक सर्व सेमीस्टर मिळून ७१.३९ टक्के गुण प्रथम ,दीक्षा सुरेश तांडेल ७०.६६% गुण मिळवून द्वितीय तर संगीता नारायण पाटकर ६८.०५ टक्के गुण मिळवून तृतीय आली. सर्व विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील असूनही कोरोना संदर्भात उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करून या विद्यार्थिनींनी हे यश संपादन केले. तसेच बॅरिस्टर नाथ पे कोविड सेंटर मध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत हे यश संपादन केले त्याबद्दल प्र.प्राचार्य अरुण मर्गज, संस्था चेअरमन उमेश गळवणकर, प्राध्यापक, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे

अभिप्राय द्या..