कळणे मायनिंग बंद करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार; मनसे जिल्हाध्यक्ष परशुराम उपरकर

कळणे मायनिंग बंद करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार; मनसे जिल्हाध्यक्ष परशुराम उपरकर

दोडामार्ग /-

कळणे येथील मायनिंग मध्ये भूस्खलन होऊन मातीचे ढिगारे साचलेल्या पाण्यात कोसळल्याने मायनिंग चे दूषित व चिखलमय पाणी गावात पसरल्याने गावातील अनेक घरांचे नुकसान झाले असता मनसे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज कळणे मायनींग येथे पाहणी केली असता त्यांनी कळणे वासीयांसी सवांद साधला. कळणे मायनींग ही मागील व आता असलेल्या दोन्ही सरकारच्या आशीर्वादाणे सुरू असून यामुळे येथील कळणे वासीयांवर हे संकट ओढवले आहे तसेच आमदार खासदार यांना कळणे ग्रामस्थांन पेक्षा कळणे मायनींग जवळची असल्याने हा प्रकार घडला आहे, आपण घटनास्थळी जात ग्रामस्थांची भेट घेतली असता ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या असता आपण कळणे मायनींग बंद केल्यास कळणे येथील संपुर्ण ग्रामस्थ मनसे प्रवेश करू असे आश्वासन कळणे ग्रामस्थांनी आपनास दिले आहे तसेच इतर तालुक्यातील खाणी संदर्भात आपण आढावा घेणार असून कळणे मायनींग बंद करण्यासाठी आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे, असे त्यांनी दोडामार्ग येथे पत्रकार परिषद घेत सांगितले असून यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष परशुराम उपरकर, मनसे दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुनील गवस,व अन्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..