वेंगुर्लेत विजेच्या तारेचा स्पर्श होऊन म्हैस मृत्युमुखी..

वेंगुर्लेत विजेच्या तारेचा स्पर्श होऊन म्हैस मृत्युमुखी..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यातील गाडीअड्डा येथील शेतकरी विष्णू धोंडू चेंदवणकर यांच्या चरण्यासाठी सोडलेल्या म्हैशीचा विजेच्या तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाला.ही घटना आज शुक्रवारी दुपारी घडली.दरम्यान चेंदवणकर यांनी वेळीच अन्य म्हैशीना दूर केल्याने अनर्थ टळला.याबाबत वीज वितरणला दुपारी २.४५ वा. माहिती मिळताच वायरमन संदेश शिरोडकर,शेखर पंडित यांनी वीजपुरवठा खंडित केला.तसेच वीज वितरणचे सहाय्यक अभियंता अशोक चव्हाण ,तलाठी यांनी पंचनामा केला.पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले.यावेळी नगरसेवक प्रकाश डिचोलकर,नगरसेविका कृतिका कुबल,महेश वेंगुर्लेकर,मनिष परब आदी उपस्थित होते.संबंधित शेतकऱ्याचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत संबंधित गरीब शेतकऱ्याला त्वरित नुकसानभरपाई मिळावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..