वेंगुर्ला /-
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट व राष्ट्रवादी डॉक्टर सेल यांच्या तर्फे महाराष्ट्र राज्यातील गंभीर पूरग्रस्त भागांत वैद्यकीय मदत पथक पाठवून आरोग्य सेवा दिली जात आहे.सध्या कोल्हापूर, सांगली ,मिरज, महाड, चिपळूण,रत्नागिरी येथील शहरात व गावांत आरोग्य सेवा देणे चालू आहे.
त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या सुचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरग्रस्त व अतिवृष्टी झालेल्या भागात आरोग्य सेवा देण्यासाठी पथक पाठविण्यात येणार आहेत.
या पथकातील डॉक्टरांकडून पूरग्रस्त व अतिवृष्टी झालेल्या भागातील रुग्णांची कोरोना पाश्वभुमीवर नियम पाळुन मोफत तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात येणार असुन जिल्ह्यातील गरजु रुग्णांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी केले आहे.
