अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत UGC चा मोठा निर्णय; राज्यसरकारचा निर्णय बदलणार जाणून घ्या..

अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत UGC चा मोठा निर्णय; राज्यसरकारचा निर्णय बदलणार जाणून घ्या..

नवी दिल्ली /-

गेल्या २ ते ३ महिन्यांपासून राज्यातल्या पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरून मोठा गोंधळ सुरू होता. परीक्षा नक्की होणार आहेत किंवा नाही, यावरून विद्यार्थ्यांमध्येही मोठा संभ्रम होता. पण त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर पडदा पडला. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने UGC च्या निर्देशानुसार ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यासंदर्भात निर्देश दिले होते. मात्र, आता या परीक्षांसदर्भात UGC नं मोठा निर्णय घेतला असून त्यामुळे राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं केलेलं परीक्षांचं नियोजन बदलणार आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांसाठी देखील हा निर्णय तणाव कमी करणारा ठरला आहे.

अभिप्राय द्या..