मुंबई /-

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता 3 महिने उलटून गेले आहेत. तर सुशांतच्या अगोदर त्याची मॅनेजर दिशा सालियान हिने देखील आत्महत्या केली होती. या दोन्ही प्रकरणांवरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे.या पत्रात नितेश राणे म्हणतात, ‘दिशा सालियानसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेला पार्टनर रोहन रॉयला सुरक्षा देण्यात यावी. दिशाचा मृत्यू झाला त्यावेळी रोहन त्या ठिकाणी उपस्थित होता. त्यामुळे दिशाच्या मृत्यूप्रकरणी रोहनचा जबाब महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे सीबीआयने देखील दिशाच्या होणाऱ्या नवऱ्याची चौकशी करावी. जेणेकरून दोन्ही मृत्यूंंमागील कारण स्पष्ट होण्यास मदत होईल.’

नितेश राणे पुढे म्हणाले, 8 जून आणि 14 जून रोजी काय घडलं याचा थेट संबंध लागतो. ज्या पार्टीमध्ये दिशा 8 जून रोजी गेली होती होती, तिथे तिच्याबरोबर काहीतरी गडबड झाली असावी असं माझं म्हणणं आहे.सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या जवळ असलेल्या रिया आणि अंकिताची चौकशी करण्यात आली. त्याचप्रमाणे रोहन रॉय दिशाच्या सर्वात जवळचा असून तो या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा आहे.’सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयद्वारे केला जात आहे. याशिवाय ईडी आणि एनसीबीकडूनही तपास चालू आहे. तर सीबीआय, एनसीबी आणि ईडीच्या चौकशीबद्दल राणे यांनी समाधान व्यक्त केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page