दिवाळीला फुटणार अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’..

दिवाळीला फुटणार अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’..

मुंबई /-

अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.अक्षयचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या रिलीजची तारिख अखेर ठरली आहे.यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे. खुद्द अक्षयने यासंदर्भात ट्विट करत याची माहिती दिली आहे. येत्या 9 नोव्हेंबर रोजी ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा आगळ्या वेगळ्या विषयाचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.अक्षयचा लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमा यापूर्वी ईदच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात येणार होता.मात्र लॉकडाऊनमुळे ते शक्य झालं नाही. त्यानंतर पुन्हा अक्षय कुमारच्या वाढदिवशीच म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलीज करण्यात येणार होता.

मात्र ते देखील जमलं नसल्याने अखेर 9 नोव्हेंबर तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे.या सिनेमात अक्षय एका तृतीयपंथी भूताची भूमिका साकारणार आहे.

अभिप्राय द्या..