जवाहर नवोदय विद्यालयाची निवड चाचणी प्रवेश परीक्षा ११ ऑगस्ट रोजी..

जवाहर नवोदय विद्यालयाची निवड चाचणी प्रवेश परीक्षा ११ ऑगस्ट रोजी..

सावंतवाडी /-

सांगेली-सावरवाड येथील जवाहर नवोदय विद्यालयातील सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता सहावी प्रवेशासाठी निवड चाचणी प्रवेश परीक्षा बुधवार ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर होत आहे. या निवड चाचणीसाठी आवेदन केलेल्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी https://cbseitms.nic.in/index.aspx या संकेतस्थळावरुन आपली प्रवेश पत्रे डाऊनलोड करून घ्यावयाची आहेत. प्रवेश पत्रासोबत परीक्षा केंद्रावर वेळेत हजर रहावे.परीक्षेस येताना मास्क, सॅनिटायझर, परीक्षा लेखनासाठी आवश्यक असलेले साधन सोबत घेऊन येणे अनिर्वाय आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्य श्रीजीतबाबू नयना -९४२८१२९२०१, उपप्राचार्य मीरा सिंह-९४२२७६६८५२, परीक्षा प्रमुख जे. बी. पाटील-९४२०२९४५८४ व एस. पी. हीरेमठ- ९४२१३४०३१२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे

अभिप्राय द्या..