You are currently viewing भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला माणगाव खोऱ्यातील नुकसानीचा पाहणी दौरा..

भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला माणगाव खोऱ्यातील नुकसानीचा पाहणी दौरा..

काही ठिकाणी करण्यात आली तातडीची मदत..

कुडाळ /-

माणगाव खोऱ्यातील नानेली, माणगाव, आंबेरी, वाडोस, मोरे, निळेली व शिवापूर येथील नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, तालुका अध्यक्ष विनायक राणे, युवक तालुकाध्यक्ष रूपेश कानडे, मोहन सावंत, बंड्या सावंत, विजय कांबळी, जोसेफ डान्टस, योगेश बेळणेकर, श्रावण धुरी, सचिन धुरी, दत्ता कोरगावकर, दीपक खरात व कार्यकर्ते उपस्थित होते.

नानेली येथे पुराचे पाणी घरात घुसल्यामुळे अनेक कुटुंबांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या वेळी जीवनावश्यक वस्तू देखील पुरात वाहून गेल्या. त्या कुटुंबांना तातडीची मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या वाटप तात्काळ करण्यात आले. अनेक ठिकाणी घरातील सामान पुरात वाहून गेले आहेत. टीव्ही, फ्रीज व इलेक्ट्रॉनिक वस्तू पाण्यामुळे व चिखलामुळे पूर्णपणे खराब झाल्या आहेत, भातशेतीचे देखील फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. याची पाहणी करून सोमवारी जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याकरता प्रयत्न करणार असल्याचे देखील गटनेते रणजित देसाई यांनी सांगितले. नुकसानग्रस्त कुटुंबांना पुढील काही दिवसांकरता लागणा-या जीवनावश्यक वस्तू, ताडपत्री व इतर सामानाची मदत भारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्या करणार येणार असल्याचे देखील देसाई यांनी सांगितले. शिवापूरला भेट देत असताना नदी वर पाणी आले असल्यामुळे लगतच्या साकवावरून नदी पार करून सुमारे दोन किलोमीटर पायी चालत जात त्या ठिकाणी नुकसानीची पाहणी करण्यात आली. तसेच रस्त्यावर दरड कोसळली असल्यामुळे रस्ता वाहतुकीला बंद रस्त्यावरील वाहतूक बंद झालेली आहे याची दखल घेऊन सदर ठिकाणी श्री.मोहन सावंत व भारतीय जनता पक्ष घावनाळे विभाग यांच्या वतीने तातडीने जेसीबी पाठवण्यात आला व सदर दरड हटवण्याच्या कामाला देखील सुरुवात करण्यात आली.

विनायक राणे जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई

अभिप्राय द्या..