खारेपाटण बाजारपेठेत घुसले पाणी.;नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

खारेपाटण बाजारपेठेत घुसले पाणी.;नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

कणकवली /-

गेले पाच ते सहा दिवस कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे खारेपाटण शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी खारेपाटण बाजारपेठेत घुसले असून व्यापारी दुकांनामध्ये तर काहींच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरले आहे.
विजयदुर्ग खाडीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण खारेपाटण शहराला पुराच्या पाण्याने वेढले असून नागरिकांच्या वस्तीमध्ये असणाऱ्या काही खाजगी तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये पुराचे पाणी गेले आहे.अचानक पुराचे पाणी वाढू लागल्यामुळे खारेपाटण मधील व्यापारी वर्गाची एकच धांदल उडाली आहे.व्यापारी वर्गाने एकमेकांच्या सहाय्याने आपले दुकानातील समान वाचविण्यासाठी प्रयत्न केले.

अभिप्राय द्या..