खारेपाटण ब्रिज वाहतुकीसाठी बंद.;शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे निर्णय..

खारेपाटण ब्रिज वाहतुकीसाठी बंद.;शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे निर्णय..

खारेपाटण /-

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खारेपाटणमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.यामुळे मुंबई – गोवा महामार्गावरील खारेपाटण येथील ब्रिटिशकालीन पूल दुपारी ३ नंतर प्रशासनाच्यावतीने बंद करण्यात आला आहे.खारेपाटण शुक नदीने रौद्र रूप धारण केले असून पुराच्या पाण्याची पातळी ही वाढत चालली आहे.तर संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर आज सहायक अभियंता राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ उपविभाग कार्यलय यांच्या वतीने खारेपाटण ब्रिज वाहतुकी करीता बंद करण्यात आला.याबतचे लेखी पत्र खारेपाटण पोलीस दुरक्षेत्र तसेच पोलीस निरीक्षक कणकवली पोलीस ठाणे तसेच कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग यांना देण्यात आले आहे.
दरम्यान खारेपाटण पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने महामार्गावर पुलाच्या दोन्ही वाजला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

अभिप्राय द्या..