अनारोजीन लोबो यांनी आमदार नितेश राणे यांच्या नावाचा वापर करू नये.;भाजपच्या महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांचा सल्ल..

अनारोजीन लोबो यांनी आमदार नितेश राणे यांच्या नावाचा वापर करू नये.;भाजपच्या महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांचा सल्ल..

सावंतवाडी /-

अनारोजीन लोबो यांनी केवळ आपल्या बातमीचा टीआरपी वाढवण्यासाठी आमचे नेते आमदार नितेश राणे यांच्या नावाचा आधार घेऊ नये, असा सल्ला भाजप महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी लोबो यांना प्रसिद्धी पत्रकातून लगावला.
लोबो यांनी आमदार नितेश यांनीच आपल्याला संजू परब यांच्या भानगडी बाहेर काढा, असे वक्तव्य केले होते, त्याला मडगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकातून उत्तर दिले आहे.
प्रसिद्धी पत्रकात मडगावकर यांनी म्हटले की, लोबो सिनिअर असून अशा प्रकारची स्टेस्टमेंट देत आहेत यावर विश्वासच बसत नाही. नितेश राणे यांनी संजू परब यांच्या भानगडी लोबो यांना बाहेर काढायला सांगितले हे एखाद्या लहान मुलाला ही न पटण्यासारखे आहे. लोबो या अनुभवाने व वयाने मोठ्या आहेत. मात्र आमच्या नेत्यांबद्दल बोलताना त्यांनी विचार करून बोलावे. महिलांची ताकद काय आहे हे आम्ही तुम्हाला लवकरच दाखवू, असा इशाराही मडगावकर त्यांनी लोबो यांना दिला.

अभिप्राय द्या..