You are currently viewing आ.नितेश राणे यांनीच मला संजू परब यांच्या भानगडी काढायला सांगितल्या.;गटनेत्या अनारोजिन लोबो यांचा गौप्यस्फोट..

आ.नितेश राणे यांनीच मला संजू परब यांच्या भानगडी काढायला सांगितल्या.;गटनेत्या अनारोजिन लोबो यांचा गौप्यस्फोट..

सावंतवाडी /-


आमदार नितेश राणेंनीच मला संजू परबांच्या भानगडी बाहेर काढा, असे सावंतवाडी दौऱ्यात आल्यानंतर सांगितले होते.असा गौप्यस्फोट केला आज लोबो यांनी केला आहे.संजू परब यांनी खोटे खरेदीखत करून एक कोटीचा घोटाळा केला, याची जाहिरात वृत्तपत्रात आली आहे ,त्याचा त्यांनी प्रथम खुलासा करावा अन्यथा आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नगरपरिषदेच्या विरोधी पक्ष गटनेत्या अनारोजिन लोबो यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

परब यांचे राणे कुंटुबाबद्दल खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेनेच्या नेत्या अनारोजीन लोबो यांनी आज येथे केला. दरम्यान नगराध्यक्ष परब यांच्या विरोधात एका वृत्तपत्रात आलेल्या जमिन घोटाळ्याबाबत त्यांनी खुलासा द्यावा, अन्यथा ते जमत नसेल तर नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, नगराध्यक्षांच्या खुर्चीवर “लँडमाफिया” बसला, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पालिकेच्या मासिक बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जयेंद्र परुळेकर, भारती मोरे, दिपाली सावंत, सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी आदी उपस्थित होते.

यावेळी लोबो यांनी श्री. परब यांच्या कारभारावर टिका केली. त्या म्हणाल्या, मी एकदा श्री. परब यांच्याशी बोलत असताना त्यांनी आमदार नितेश राणे हे पुन्हा पुन्हा सावंतवाडीत का येतात?, असे त्यांना विचारायला मला सांगितले होते. त्यामुळे त्यांचे राणे कुंटुबाबद्दल खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत, असेही त्यांनी सांगितले.तसेच सावंतवाडीतील एका दौऱ्यात खुद्द नितेश राणेंनीच मला यांच्या भानगडी काढा, असे सांगितले होते. असा गौप्यस्फोट लोबो यांनी आज केला आहे.

अभिप्राय द्या..