कुडाळ /-


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कुडाळ शहराच्या वतीने तसेच आमदार मा. वैभवजी नाईक यांच्या सहकार्याने शुक्रवार दि. २३/०७/२०२१ ते सोमवार दि. २६/०७/२०२१ या कालावधीत कुडाळ शहरामध्ये विविध ठिकाणी मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शुक्रवार दि. २३/०७/२०२१ रोजी सकाळी ९ ते १२ वा. या वेळेत दैवज्ञ भवन हॉल कुडाळ व ब्राह्मणदेव वडाचे झाड खालची कुंभारवाडी या दोन ठिकाणी शिबीर संपन्न होणार आहे. तरी कुडाळ शहरातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी चे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक तसेच कार्यकर्ते व शिवसैनिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख श्री राजन नाईक व शिवसेना शहर प्रमुख श्री संतोष शिरसाट यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page