चौके /-
मालवण तालुक्यातील आंबडोस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१. या शाळेची चिऱ्यांची दगडी सरंक्षक भिंत काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे आज बुधवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता अचानकपणे रस्त्यावर कोसळली. त्यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले.
सुदैवाने रस्त्यावर रहदारी नसल्याने जिवितहानी झाली नाही. दरम्यान रस्त्याच्या मध्यभागी पडलेली सरंक्षक भिंत, (चिरे) बाजूला करून रस्ता खुला करून रहदारी सूरू करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय परब, राजु कदम, रामदास नाईक, निवृती परब, आणि इतर ग्रामस्थांनी श्रमदान केले आणि रस्ता वाहतूकीसाठी मोकळा केला.
घटनास्थळी पंचनामा करण्यात आला त्यावेळी आंबडोस सरपंच सौ. राधा वरवडेकर, तलाठी रवी शेंजवळ, ग्रामसेवक महेंद्र मोरे, शाळेचे मुख्याध्यापक स्वप्नाली शिंदे, शिक्षिका यशोदा गावीत, ग्रामपंचायत कर्मचारी अजित परब, तसेच ग्रामस्थामधून राजू कदम, केशव नाईक, आबा राणे, प्रशांत नाईक, धानजी चव्हाण, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.