जर तुमचे पैसे चुकून दुसऱ्याच्या अकाउंटवर गेले तर लगेच काय करावे जाणून घ्या…

जर तुमचे पैसे चुकून दुसऱ्याच्या अकाउंटवर गेले तर लगेच काय करावे जाणून घ्या…

दिल्ली दिल्ली/-

बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात सर्व काही सुकर झालं आहे. त्यामुळे बँकिंग सेवा देखील सोप्या झाल्या आहेत, ज्यामध्ये मोबाईल बँकिंग, डिजिटल व्हॉलेट, गुगल पे, भीम अँप द्वारे पैसे पाठवण्याचे काम पटकन करता येत आहे. ये सर्व माध्यम पैसे पाठवणे किंवा पैसे मागवण्यासाठी अत्यंत सोयीस्कर आहेत. पण यामध्ये अनेकवेळा चुका देखील होऊ शकतात.कधी कधी अकाउंट नंबर टाइप करताना चूक होते आणि आपले पैसे दुसऱ्याच खात्यावर जाऊ शकतात. जर तुम्ही चुकून टाकलेला अकाउंट नंबर अस्तित्वातच नसेल तर ते पैसे तुमच्या खात्यावर पुन्हा जमा होतात. पण जर तो अकाउंट नंबर बँकेत अस्तित्वात असेल तर तुमचे पैसे त्या खात्यावर जाऊ शकतात, अशावेळी आपल्याला टेन्शन येतं की आता काय करायचं.

जर कधी तुमच्यासोबत असं झालं तर काय करायचं जाणून घ्या.सर्वात आधी शाखा मॅनेजरशी संपर्क साधा. तुम्ही तुमच्या बँकेत मेलद्वारे कळवा किंवा त्यांच्याशी संपर्क साधा. जर तुमचे पैसे एखाद्या दुसऱ्या शाखेच्या खातेदाराच्या खात्यात गेले असतील तर तीच शाखा तुमच्या समस्येचे निरसन करू शकते. तुम्ही संबंधित मॅनेजरला जाऊन भेटा. अशा वेळी तुम्हाला पैसे पाठवल्याचा दिवस, वेळ, ज्याला पैस्व गेले त्याचे अकाउंट नंबर ही माहिती सांगावी लागते.

तुमच्याकडे लीगल ऍक्शनचा देखील पर्याय उपलब्ध आहे. काही परिस्थितीत ज्या व्यक्तीच्या अकाउंट मध्ये चुकून पैसे गेले आहेत ती व्यक्ती बँकेच्या सांगण्यावरून पैसे परत करू शकते. जर ती संबंधित व्यक्ती पैसे परत करण्यास नकार देत अस्वल तर बँक लीगल ऍक्शन घेऊ शकते. तुम्ही तुमच्या कडून देखील अशा प्रकारची लीगल ऍक्शन घेऊ शकता.अशा परिस्थितीपासून वाचण्यासाठी तुम्ही स्वतः सावध राहिलं पाहिजे.जर तुमचे पैसे चुकून दुसऱ्याच्या अकाउंटवर गेले तर लगेच बँकेत याबाबतची तक्रार करा. कोणतेही बँक एखाद्या ग्राहकाच्या अनुमतीशिवाय बँकेतून पैसे काढू शकत नाही. बँक आपल्या ग्राहकांची वैयक्तिक माहिती डाऊ शकत नाही. अशावेळी तुम्ही बँकेत तक्रार केल्यास बँक त्यावर उपाय सुचवू शकते.

अभिप्राय द्या..