२४ तास मुसळधार पाऊस पडत असल्याने कुडाळ तालुक्यातील भंगसाळ आणि निर्मला नदीने धोक्याची पातळी ओलांडली

२४ तास मुसळधार पाऊस पडत असल्याने कुडाळ तालुक्यातील भंगसाळ आणि निर्मला नदीने धोक्याची पातळी ओलांडली

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावासामुळे नदी, नाले, ओहोळ, दुथडी भरून वाहू लागले आहेत. दरम्यान पावसाची कुडाळ तालुक्यातील नोंद पाहता ती १३५ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे.कुडाळ तालुक्यातील भंगसाळ नदी त्याच प्रमाणे माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शेतीत पाणी घुसल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शेतकऱ्याची शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली असुन पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने दोन दिवस शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

अभिप्राय द्या..