प्रशासक असल्यामुळे कुडाळ नगरपंचायत मद्धे सावळा गोंधळ.;माजी नगराध्यक्ष ओंकार तेली

प्रशासक असल्यामुळे कुडाळ नगरपंचायत मद्धे सावळा गोंधळ.;माजी नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायतमध्ये सध्या प्रशासक कार्यरत असल्याने लोकप्रतिनिधींचा कार्यकाल संपल्यामुळे कोणीही नगरपंचायत मध्दे कार्यरत नाही त्यामुळे आंधळा दळतोय आणि कुत्र पीठ खातय अशी अवस्था कुडाळ नगरपंचायत ची,प्रशासनाने केली आहे.असा आरोप माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी केला आहे.खरतर करोना महामारीच्या काळात अनेक लोकप्रतिनिधींनी सामाजिक,बांधिलकीतून जनतेला दिलेला आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवले,आहेत.सद्यस्थितीत जनता मेटाकुटीला आलेली आहे नुकतीच वृत्तपत्रातून बातमी आली की नगरपंचायतीच्या कोणातरी कर्मचाऱ्यांकडून स्मशानभूमी येथे दहन करण्यासाठी १६ हजार रुपये घेतले गेले.ही गोष्ट घडली असल्यास सर्वप्रथम आम्ही निषेधच करतो कारण ही गोष्ट माणुसकीला काळीमा लावणारी आहे.तसेच या गोष्टीची मुळापर्यंत जाऊन सखोल चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी करणार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सांगितले आहे.

अभिप्राय द्या..