वैभववाडी /-

गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने दडी मारल्यामुळे शेतीची कामे खोळंबली होती. अखेर गेल्या दोन-तिन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पुन्हा शेतीच्या कामांना वेग आला आहे.

वैभववाडी तालुक्यातील मौजे घानेगडवाडी येथे बाबू शामु खरात, शशिकांत श्रीधर रावराणे व योगिता वासुदेव भोगले यांच्या शेतात “श्री” पद्धतीत भात लागवड तंत्रज्ञान व “युरिया ब्रिकेट्स” चा नियंत्रित वापर याविषयी वैभववाडी कृषी विभागाच्या वतीने प्रात्यक्षिक घेण्यात आले व भात लावणीच्या नवनवीन पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करून योग्य खत मात्रेचा वापर करावा असाही सल्ला कृषी विभागाचे कृषी सहायक श्री गव्हाणे एस पी यांनी दिला कोरोना काळात देखील कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झालेला पहावयास मिळत आहे. यावेळी कृषि पर्यवेक्षक पाटील ए. आर. व कृषी सहाय्यक गव्हाणे एस. पी. यांनी सुयोग्य मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page